
मासेमारी बंदीच्या काळात रत्नागिरीत मासेमारी सुरुच
मासेमारी बंदीच्या काळात रत्नागिरीत अवैद्य मासेमारी सध्या सुरु आहे मात्र याकडे मत्स विभागाचं दुर्लक्ष होताना दिसतय.महाराष्ट्र सागरी अधिनियमानूसार 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांच्या कालावधीत मासेमारी बंदी असते.या कालावधीत जलधी क्षेत्रात यांत्रीकी नौकातून मच्छिमारांना मासेमारी करता येत नाही मात्र रत्नागिरीत सध्या मिनी पर्सेनेट नौकेतून राजरोस जोरदार मच्छीमारी सुरु आहे ही मासळी रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात उतरवली जातेय. मिरकरवाडा बंदरापासून हाकेच्या अंतरावर असणा-या मत्सविभागाचं याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतय. मत्स अधिनियमन कायद्याचं उल्लंघन करणा-या मच्छिमारांवर मत्सविभागाकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.




