
अर्जुना नदीत केसीसी कंपनीकडून टाकण्यात आलेला भराव काढण्यासाठी महसूल प्रशासनाकडून दुर्लक्ष
राजापूर शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांमध्ये साचलेला गाळ लोकसहभागातून उपसण्याचे काम सुरू असताना वरची पेठ येथील नवीन पुलाचे काम सुरू असताना अर्जुना नदीत केसीसी कंपनीकडून टाकण्यात आलेला भराव काढण्यासाठी मात्र महसूल प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.त्यामुळे परिसरातील नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना शहरातील वरचीपेठ येथे अर्जुना नदीवर महामार्गावरील सर्वांत उंच पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या पुलाचे काम सुरू असताना अर्जुना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आला होता. पावसाळ्यात हा भराव तसाच ठेवण्यात आला होता. त्यामुळे नदीचा प्रवाह देखील बदलला होता. www.konkantoday.com




