सायबर गुन्हेगारांपासून आपली आर्थिक फसवणूक होण्यापासून सावध रहा!
सध्या सायबर गुन्हयांची पध्दत पाहता सायबर गुन्हेगार हे शेअर/फॉरेक्स मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यावर दामदुप्पट परताव्याचे अमिष दाखवून पिडीत व्यक्तींना पैसे पाठविण्यास भाग पाडल्याचे प्रकार देखील समोर आलेले दिसून आलेले आहेत तसेच सायबर गुन्हेगार हे पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी तसेच ई.डी. विभागाचे अधिकारी असल्याचे भासवतात तसेच बनावट पोलीस अथवा शासकीय विभागाचे बनावट ओळखपत्रे पाठवून, पिडीत व्यक्तीला फोन केला जातो व पिडीत व्यक्तीच्या आधारकार्ड चा गैरवापर करुन त्याव्दारे बनावट सिम कार्ड खरेदी केले जाते व त्याआधारे फोन कॉल वरून “तुमच्या नावावर कोणीतरी बँक अकाऊंट सुरु केलेले आहे व त्यावर मनी लॅाड्रींगचा पैसा जमा झालेला आहे व तुमच्या विरुध्द आता ईडी/शासकीय चौकशी लागणार असून तुमचे बँक अकाऊंट व प्रॉपर्टी सिझ करण्यात येणार आहे” असे सांगीतले जाते. तसेच सदर प्रकरण मिटविण्याकरीता सायबर गुन्हेगार हे “तुम्ही पैसे दया किंवा तुमचा सहभाग नसल्याचे सिध्द करण्यासाठी तुमचे बँक अकाऊंट व्हेरीफाय करणे गरजेचे आहे व त्याकरीता काही रक्कम पाठवा. तुमचे व्हेरीफिकेशन झाल्यावर तुमचे पैसे परत पाठविले जातील” असे सांगून जनतेची आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आलेले आहे. तरी, सर्व नागरिकांनी सर्वच प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून सावध राहणे आवश्यक आहे. कोणत्याही तातडीच्या शंका किंवा समस्यांसाठी, कृपया आमच्या सायबर पोलीस ठाणे हेल्पलाइन नंबर +918830404650 वर संपर्क साधावा अथवा डायल-112 वर संपर्क साधावा.*आवाहन* याद्वारे सर्वांना आवाहन करण्यात येते की, सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याकरीता आपण आपल्या मोबाईलवर आलेले अनोळखी कॉल व सोशल मिडीयावर येणाऱ्या अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये तसेच अनोळखी व्यक्तींनी पाठविलेल्या लिंकवर क्लिक करु नये.श्री. धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.