वालावलकर रूग्णालयात कार्डिओपल्मनरी रिहॅबिलीटेशन आणि फिटनेस लॅबमधून अनेक सुविधा उपलब्ध

डेरवण येथील भ. क. ल. वालावलकर ग्रामीण रूग्णालयात हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आणि श्‍वसनासंबंधीच्या फिजिओथेरपी विभागात कार्डिओपल्मनरी रिहॅबिलीटेशन आणि फिटनेस लॅब उपलब्ध करण्यात आली आहे. या लॅबमधून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रूग्णालय प्रशासनाकडून नुकतीच देण्यात आली आहे. रूग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हृदयाचा झटका पुनर्वसन, हृदयाचा झटका पुनर्वसन, हृदयाची शस्त्रक्रिया पुनर्वसन, शस्त्रक्रियेपूर्वीची व नंतरची काळजी, दीर्घकालीन निरोगी फुफ्फुसे, अस्थमा, पोस्ट कोविड पुनर्वसन, लठ्ठपणा व्यवस्थापन अशा सुविधा या लॅबमधून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोकणात अशा पद्धतीने उपचार सुविधा प्रथमच खूपच माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button