रत्नागिरी जिल्ह्यात १० वर्षात केवळ तीन शैक्षणिक संस्था वाढल्या
रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणासह अभियांत्रिकी शिक्षणाची रूची कमी आहे. दहा वर्षापूर्वी अशा शिक्षणाची जी अवस्था होती ती दहा वर्षानंतरही तशीच आहे. या शिक्षण संस्थांमध्ये असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार अपेक्षित प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे व्यावसायिक शिक्षण संस्थांची वाढही मंदावलेली आहे. गेल्या १० वर्षात केवळ ३ संस्था वाढल्या. गेल्या शैक्षणिक वर्षात तर अशा व्यावसायिक आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्थातील शिक्षक, प्रोफेसर आणि कर्मचारी वर्ग विद्यार्थी शोधण्यास बाहेर फिरत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक बुद्धी किती उत्तम आहे हे गेल्या अनेक वर्षातील दहावीबारावीच्या निकालातून दिसून आले आहे. व्यावसायिक शिक्षण भविष्य यशस्वी करण्यासाठी महत्वाचे असूनही असे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल किंवा रूची नसते. त्यामुळे व्यावसायिक, तांत्रिक अभियांत्रिकी शिक्षण देणार्या संस्था विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी शक्यते सर्व प्रयत्न करत आहेत. व्यावसायिक किंवा तांत्रिक शिक्षणातून नोकरी, रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, तरीही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या शिक्षणाकडे वळण्याचे प्रमाण फारच कमी आहे.www.konkantoday.com