
मुसळधार पाऊसही पवारांना थांबवू शकला नाही !
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अनोखे रुप सातारकरांना शुक्रवारी पाहायला मिळाले. राज्यातील अनेक भागांमध्ये आज पाऊस पडत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांना सभा रद्द कराव्या लागल्या. मात्र, शरद पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यात आपण इतर नेत्यांपेक्षा वेगळे का आहोत, हे दाखवून दिले.
सातारा लोकसभा मतदारसंघात आज श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी पवारांची साताऱ्यात सभा होती याठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. मात्र, शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण ठोकले. तब्बल अर्धा तास पावसात उभे राहू शरद पवार यांनी फटकेबाजी केली. या सभेसाठी हजारो लोक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com