मान्सून दहा जून पर्यंत महाराष्ट्रात सक्रिय होणार
मान्सूनचे आगमन कधी होणार याची चातक पक्षा प्रमाणे सर्वच जण वाट पाहात होते. त्यांची ही प्रतिक्षा आता संपली आहे. अखेर मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. केरळच्या कोट्टयम जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हा मान्सूनचा प्रवास आता तसाच पुढे होणार आहे. केरळ प्रमाणेच इशान्य भारतातही पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे. आता महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कधी होणार याची प्रतिक्षा आहे. भारतीय हवामान विभागाने 31 मे रोजी मान्सून केरळ मध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळ मध्ये दाखल झालेला मान्सून पुढील दहा दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये दाखल झालेल्या या मान्सूनचा प्रवास पुढे केरळ कर्नाटक महाराष्ट्र असा होणार आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सून 10 जूनला दाखल होईल.