
देवगड तालुक्यातील मुटाट येथून राजापूरच्या दिशेने शिकारीच्या उद्देशाने जात असताना पाच जणांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले
देवगड तालुक्यातील मुटाट येथून राजापूरच्या दिशेने शिकारीच्या उद्देशाने जात असताना पाच जणांना कणकवली पोलिसांनी खारेपाटण तपासणी नाक्यावर ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून काडतुसच्या बंदुकीसहित जिवंत काडतुसे व प्रवासासाठी वापरलेली कार असा ६ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.त्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.याबाबत पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित आरोपी एका कारमधून देवगड येथून राजापूरच्या दिशेने जात होते. संशय आल्याने खारेपाटण पोलिस तपासणी नाका या ठिकाणी त्यांच्या गाडीची तपासणी करण्यात आली. या गाडीमध्ये देवगड तालुक्यातील संशयित आरोपी जितेंद्र बाबाजी पाळेकर (४०,रा. मुटाट पाळेकरवाडी), गोपाळ लक्ष्मण पाळेकर (५४, रा. मुटाट, पाळेकरवाडी), विसंगत विश्वास साळुंखे (३१,रा. मुटाट, बौद्धवाडी), विनोद राजाराम साळुंखे (३६,रा. मुटाट, बौद्धवाडी), संतोष सखाराम पाळेकर (५०,रा. मुटाट, पाळेकरवाडी) हे पाचजण होतेwww.konkantoday.com