जयगड येथे प्रादेशिक पाणी योजनेचे अंदाजपत्रक वाढले १७ कोटींचे वाढीव अंदाजपत्रक
जयगड प्रादेशिक पाणी योजनेचे जलजीवन मिशन योजनेंतर्गत कळझोंडी धरणाचे घेण्यात आलेले दुरूस्तीचे अंदाजपत्रक चांगलच फुगले आहे. धरणाच्या वाढीव कामासाठी सुमारे १७ कोटींचे वाढीव अंदाजपत्रक करण्यात आले आहे. त्यामुळे मुळ २१ कोटी ५७ लाखाची ही कोजना आता ४० कोटींवर गेली आहे. आतापर्यंत धरणाचे ६० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती संबंधित विभागाकडून मिळाली. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात नव्या १२ पाणी योजना राबविण्यात येत आहेत.सुमारे ४१० कोटी ५८ लाखांच्या या योजना असून त्याला २९१ कोटी ८२ लाख रुपये मंजूर झाले आहे. या वर्षाच्या सुरूवातीला योजनांना कार्यारंभ आदेशही दिला आहे. योजनांचे काम सुरू झाले आहे परंतु अनेक योजनांना पुढील कामासाठी खाजगी जागा मिळत नसल्याने काही ठिकाणी विकास कामात अडथळा येत आहे. बक्षिसपत्र न मिळाल्याने या योजनांचे काम करणार्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणापुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. www.konkantoday.com