
शौकत मुकादम यांच्या मागणीबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची आमदार भास्कर जाधव यांची मागणी
चिपळूण शहरातील बहाद्दूरशेख नाका येथे आरक्षित असलेली जागा बेरोजगारांना व्यवसायासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकदम यांनी केली आहे. या मागणीची गांभीर्याने दखल घेवून त्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करावी, असे पत्र शिवसेना उबाठा गटाचे नेते, आमदार भास्करशेठ जाधव यांनी चिपळून नगर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांना दिले आहे. www.konkantoday.com