शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर वीजतंत्री, जोडारी, यांत्रिक डिझेल, ड्रेसमेकिंग, नळ कारागीर व्यवसायासाठी ३ जूनपासून प्रवेश अर्ज

रत्नागिरी, : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर येथे वीजतंत्री, जोडारी, यांत्रिक डिझेल, ड्रेसमेकिंग, नळ कारागीर या पाच व्यवसायासाठी प्रवेश अर्ज भरण्याची सुरुवात 3 जून रोजी पासून होणार आहे. त्याचे सविस्तर वेळापत्रक लवकरच प्रसिध्द होईल. अधिक माहितीसाठी संस्थेत संपर्क करा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य र. वि. कोकरे यांनी केले आहे. https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरणे सुविधा व इतर माहिती उपलब्ध आहे. प्रवेशित पात्र प्रशिक्षणाथ्यीना नियमानुसार दरमहा रुपये ५००/- मात्र विद्यावेतन मिळणार आहे. तसेच इयत्ता दहावी व बारावी समकक्षतेची सुध्दा सोय आहे. पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश मिळण्याची सोय आहे. लाभार्थ्याना त्यांचे प्रवेश अर्ज भरणे, अर्ज निश्चितीकरण करणे, व्यवसाय भरणे या बाबी विहित वेळेत पूर्ण कराव्यात.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button