राष्ट्रीय बीच टार्गेट बॉल अजिंक्यपद स्पर्धेत ११ राज्यातील १२ संघ सहभागी
गुहागर समुद्रकिनारी आयोजित केलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय बीच टार्गेट बॉल अजिंक्यपद स्पर्धेत ११ राज्यातील १२ संघ सहभागी झाले आहेत. राज्यभरातील ३०० खेळाडू कौशल्य दाखवणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर यांच्या हस्ते झाले. ही स्पर्धा बीच टार्गेट बॉल असोसिएशन ऑफ सांगली (महाराष्ट्र) यांनी केले आहे.बीच टार्गेट बॉल हा क्रीडाप्रकार नवीन असून, भारतात पाच वर्षे खेळला जात आहे. या खेळाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा मागील वर्षी (२०२३) गोवा येथे झाली. गुहागरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, पंजाब व मुंबई (स्वतंत्र संघ) या राज्यांचे संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनालाआंतरराष्ट्रीय बीच टार्गेट बॉल असोसिएशनचे सदस्य रवी सिंग, महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र कदम, तेलंगणाचे बाबू नाईक, आंध्रप्रदेशचे रेवनाथ डी., कर्नाटकचे श्रीधर यांच्यासह गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर मोरे आदी उपस्थित होतेwww.konkantoday.com