
येत्या 24 तासांत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील
गेल्या काही दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला होता. आता मान्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण तयार होत असून, आता मोसमी वारे हळूहळू आगेकूच करीत आहेत. त्यामुळे येत्या 24 तासांत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.केरळसह दक्षिण अरबी समुद्र, मालदिवचा उर्वरित भाग, लक्षद्वीपचा उर्वरित भाग, ईशान्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वारे आगेकूच करतील, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात येतंय. तसंच येत्या 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हानं सर्वचजण त्रासले आहेत. आता प्रत्येकजण चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहे. याबाबत आता हवामान खात्यानं (IMD) चांगली बातमी दिली आहे. येत्या 24 तासांत कधीही मान्सून भारतीय सीमेत प्रवेश करू शकतो, आयएमडीनुसार, पुढील 24 तासांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल राहील.www.konkantoday.com