
मुंबई – गोवा महामार्गावर इन्सुली पोलिस तपासणी नाक्यावर७ लाख २० हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारुसह एकूण १९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
_मुंबई – गोवा महामार्गावर इन्सुली पोलिस तपासणी नाक्यावर बांदा पोलिसांनी बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई केली. यात ७ लाख २० हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारुसह एकूण १९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी इक्बाल जुमाभाई थेबा (२६, राह जुनागड सिटी, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बुधवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.या कारवाईत १२ लाखांचा ट्रक (जीजे ०१ डीवाय ५५९४) ताब्यात घेण्यात आला. तसेच ७ लाख २० हजार रुपयांची मोबी व्होडका ऑरेंज असे लेबल असलेल्या दारूचे २०० बॉक्स जप्त करण्यात आलेत. तसेच ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १९ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.www.konkantoday.com




