
मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याचे काम तांत्रिक अडचणीमुळे रखडले
पांढरा समुद्र ते भाटकरवाडा या टप्प्यातील मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याचे काम तांत्रिक अडचणीमुळे रखडले आहे. येथील किनारपट्टीवरील डेंजर झोनमधील हा भाग ओळखला जात असून या पावसाळ्यात या भागाला धोका निर्माण होण्याच्या शक्यतेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बंधार्याची २४ मार्चची डेडलाईन होती. अजूनही सुमारे १३०० मीटर अंतरातील बंधार्याचे काम शिल्लक आहे. त्या मुदतवाढीसाठी नव्याने प्रस्ताव पाठवला जाणार आहे.यंदाच्या पावसाळ्यापूर्वी या धूपप्रतिबंधक बंधार्याचे हे काम व्हावे अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे.www.konkantoday.com