नालेसफाई यासह विविध प्रश्नांसाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांची नगर परिषदेवर धडक
रत्नागिरी शहरात निर्माण झालेली पाण्याची अभूतपूर्व टंचाई, आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजताना शहरात पसरलेली डेंग्यूची साथ, नालेसफाई यासह विविध प्रश्नांसाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी रत्नागिरी नगर परिषदेवर धडक दिली. न.प. प्रशासकांना धारेवर धरल. नागरिकांच्या संयमी वृत्तीचा अंत पाहू नका, यापुढे आंदोलन शांततेत होणार नाही, असा इशाराच महाविकास आघाडीने दिला.रत्नागिरी नगर पालिकेच्या कारभाराविरोधात महाविकास आघाडीचे पदाधिकारी धडकले. उबाठाचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी, क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निलेश भोसले, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, कॉंग्रेसचे दीपक राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.रत्नागिरी न.प. हद्दीत पाणी टंचाई असून एकदिवसीय आड पाणी पुरवठा सुरू आहे. नगर पालिकेकडून तीन टँकरने पाणी पुरवठा सुरू असून ते टँकर राज्यात सत्तेत असणार्या पदाधिकार्यांसाठीच सुरू आहेत का, अन्य भागांमध्ये पाणी टंचाई नाही का, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला. यापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. सर्वांना समान न्याय मिळत होता. परंतु आता परिस्थिती बदलली असून ठराविक ठिकाणीच टँकर जात असल्याचे बंड्या साळवी यांनी संगितले. यापुढे प्रत्येक प्रभागात टँकरचे योग्य नियोजन झाले पाहिजे, असा इशाराच देण्यात आला. शीळ धरण ते पंपिंग हाऊसमधील पाईपलाईन टाकण्यास उशिर का होत असल्याचा प्रश्नही करण्यात आला. नळपाणी योजना पूर्ण झाली असताना पंपिंग हाऊसपर्यंत लाईन पूर्ण होणे आवश्यक होते. या कामासाठी फेब्रुवारीमध्ये दुसर्यांदा मंजुरी मिळाली असताना दि. ७ मेला मतदान झाल्यानंतर तत्काळ काम का सुरू झाले नाही, असा सवालही करण्यात आला. यामुळे हे काम पावसाळ्यापूर्वी तातडीने करण्यात यावे अन्यथा जेटीही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाईल. असेही उपस्थित पदाधिकार्यांनी सांगितले. www.konkantoday.com