दारूच्या नशेत गाडी चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्‍या चालकाला प्रवाशांनी दाखवला इंगा

राजापूर आगारातील मद्यधुंद एसटी चालकाला प्रवाशांनी पोलीस स्थानकात नेत सोमवारी चांगलाच इंगा दाखविला. सायंकाळी उशिरापर्यंत या चालकाच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. दारूच्या नशेत प्रवाशांच्या जीविताशी खेळणार्‍या चालकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.सोमवारी राजापूर आगारातून सायंकाळी पाच वाजता सुटणारी राजापूर-आंबोळगड एसटी बस राजापूर आगारातून सुटली. जवाहर चौक येथे एसटी वळून पुन्हा राजापूर डेपोमध्ये गेली. या दरम्यान या बसवरील चालक दारूच्या नशेत असल्याचे गाडीतील प्रवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी चालकाला गाडी एसटी आगारात नेण्यास सांगितले. मात्र दारूच्या नशेत असलेल्या चालकाने प्रवाशांची वाद घालायला सुरूवात केली. त्यावेळी चालकाला गाडीतून खाली उतरविण्यात आले. मात्र त्याला धडक चालताही येत नव्हते. त्यामुळे प्रवाशांनी अखेर ही बाब राजापूर आगारातील  अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर संबंधित अधिकारी आणि प्रवाशांनी संबंधित चालकाला राजापूर पोलीस स्थानकात आणले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button