
दापोली तालुक्यातील कुडावळेत बंधार्याला ४ महिन्यातच गळती
दापोली तालुक्यातील कुडावळे गावठण जलजीवन अंतर्गत नळपाणी योजनेचे सिमेंट बंधारा बांधून ४ महिने होत नाहीत तो त्याला गळती लागल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत. या संदर्भातील पत्र दापोलीच्या गटविकास अधिकार्यांना दिले आहे.ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुडावळे गावठण येथे जलजीवन मिशन अंतर्गत सिमेंट बंधार्याचे काम मंजूर आहे. या बंधार्याचे काम पूर्ण होवून ४ महिन्याच्या आत या बंधार्याला गळती लागली आहे. www.konkantoday.com




