
चिपळूण शहरात विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू
वीजखांबावरून पलिकडे झाडावर जात असलेल्या माकडाला विजेचा धक्का बसून त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी शहरातील हॉटेल हायवेसमोर घडली. अनेक तास हे माकड वीजखांबावर चिकटून होते. अखेर महावितरणचे कर्मचारी दाखल झाल्यानंतर वीजपुरवठा बंद करून त्या माकडाला वीज खांबावरून खाली काढले.केवळ जंगल भागात दिसणारी माकडे सर्रासपणे शहरात दिसू लागली असून शहरातील वनसंपदा एकप्रकारे या माकडांसाठी आसरा बनला आहे. मोठ्या संख्येने दाखल शहरात येणार्या माकडांना वीजवाहिनीच्या तारा एक समस्या बनली असून यातूनच विजेच्या धक्क्याने अनेकदा माकडे जखमी तर मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. www.konkantoday.com