
चिपळूण शहरातील गाळाचे ढिगारे पावसाळ्यात नागरिकांच्या अडचणी वाढवणार
दोन वर्षापूर्वीच्या प्रलयंकारी महापुरानंतर शिवनदी, वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा केला जात आहे. उपसा केलेला गाळ हा शहरातील सखल भागात टाकण्यात आला. मात्र गांधीनगर भागात गाळ टाकताना कोणतीही खबरदारी घेतली न गेल्याने तेथील गाळाचे ढिगारे आता पावसाळ्यात अडचणीचे ठरणार आहेत. याबाबत स्थानिक रहिवाशांनी या गाळाच्या ढिगार्यांना आक्षेप घेतला असून त्यावर कार्यवाही न केल्यास आंदोलनात्मक पाऊल उचलण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.महापुराला वाशिष्ठी व शिवनदीतील साचलेला गाळ कारणीभूत असल्याचे सांगत चिपळूणवासियांनी महिनाभर आंदोलन केले. त्यातूनच मग गाळ उपशाला गती मिळाली. गेली २ वर्षे येथील नद्यांमधील गाळ उपसा करून तो शहरात ठिकठिकाणी टाकला जात आहे. www.konkantoday.com