गेले अनेक महिने अडकलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे

कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांची लेखी परीक्षा १० जूननंतर होणार असल्याचे प्रशासनाला सांगण्यात आले आहे. कंत्राटी ग्रामसेवकाच्या १८५ जागेसाठी तब्बल ४१ हजार १४५ अर्ज दाखल झाले आहेत.जिल्हा परिषद वर्ग ३ व ४ची भरती प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली. यामध्ये विविध संवर्गाच्या ७०० जागा रिक्त होत्या. त्यासाठी भरती प्रक्रिया होती. यापैकी अनेक जागांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती; मात्र मध्यंतरी यातील काही संवर्गातील पदासाठी भरतीवर आक्षेप घेत काही उमेदवार न्यायालयात गेले होते. विशेषत: ग्रामसेवक या पदासाठी न्यायालयात गेले होते. हा विषय न्यायालयाने निकाली काढत भरती करण्याचे आदेश दिले; परंतु त्याच दरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने ही प्रक्रिया अडकली. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता ही प्रक्रिया होणार आहेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button