खेड शहरातील तुंबलेली गटारे-नाले मोकळी करण्याचे काम सुरू
गेल्या दोन आठवड्यात खेड शहरात झालेल्या अवकाळी पावसाच्या प्रवाहात वाहून आलेल्या प्लास्टिक कचर्याबरोबरच चिखलमिश्रित गाळामुळे शहरातील काही गटारे-नाले सांडपाण्यामुळे तुंबली आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहून परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने रहिवाशांसह वाहनचालक व पादचार्यांना नाक मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. या धर्तीवर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील सफाई कर्मचार्यांमार्फत तुंबलेली गटारे, नाले मोकळी करण्याचे काम सोमवारी युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.www.konkantoday.com