आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा अडचणीत, ॲट्रॉसिटी अंतर्गतही गुन्हा दाखल

नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. मनुस्मृतीविरोधात आंदोलन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल कण्यात आला आहे.एवढंच नाहीतर ॲट्रॉसिटी अंतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे.शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधली श्लोकांचा समावेश करण्याचा विचार केला जात आहे. त्याविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन पुकारले होते. आज महाडमध्ये त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं. पण यावेळी आव्हाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी सोबत आणलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडले. त्यामुळे महाड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी बजावलेले नोटीसीचं उल्लंघन करून नियमबाह्य जमाव जमावल्या बाबतगुन्हा दाखल झाला आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या प्रती फाडल्या प्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर आंदोलकांवरही गुन्हेदाखल झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button