गुहागर तालुक्यात बत्तीस वर्षीय महिला सरपंचांची आत्महत्या

गुहागर तालुक्यातील महिला सरपंच उर्वी मोरे यांनी आत्महत्या केल्याने पिंपर गावासह तालुक्याला धक्का बसला आहे. महिला सरपंचाने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पिंपर येथील ३२ वर्षीय महिला उर्वी उदय मोरे यांनी तणनाशक औषध घेतले. औषध घेतल्याने अत्यवस्थ झालेल्या उर्वी यांना नातेवाईकांनी तातडीने श्रृंगारतळी येथील डॉ. राजेंद्र पवार यांच्या दवाखान्यात नेले. त्यांनी तातडीने डेरवण येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तेथे उपचार घेत असताना उर्वी यांचा मृत्यू झाला. उर्वी यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली असल्याची नोंद सावर्डे पोलीस ठाण्यात करण्यात आली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button