
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली रेवाळेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात ३ पाडे ठार
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली रेवाळेवाडी येथे बिबट्याने थेट गोठ्यात प्रवेश करत ३ पाडे ठार केयाची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे आंगवली परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.रविवारी मध्यरात्री बिबट्याने विश्राम रेवाळे यांच्या मालकीच्या गोठ्या प्रवेश केला. यावेळी गोठ्यात ६ जनावरे बांधली होती. यातील तीन पाड्यांवर बिबट्याने हल्ला चढवून ठार केले. हा गोठा घरापासून १ कि.मी. अंतरावर आहे. रेवाळे सोमवारी सकाळी गोठ्यामध्ये गेले असता ३ पाडे मृतावस्थेत दिसले. यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून पाडे ठार केल्याचे स्पष्ट झाले. याची खबर वनविभागाला देण्यात आली. वनपाल, वनरक्षक सकाळच्या सत्रात कामात व्यस्त होते. दुपारनंतर वनपाल तौफीक मुल्ला व वनरक्षक सहयोग कराडे यांनी घटनास्थळी जावून पाहणी व पंचनामा केला. रेवाळे यांना लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.www.konkantoday.com