
जिल्हा परिषदेच्या स्वच्छता सर्वेक्षणात ८४५ ग्रामपंचायती पास
रत्नागिरी ः जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व स्वच्छता अभियान सर्व्हे करण्यात आला असून त्यामध्ये जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायती पास झाल्या असून त्यांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. मात्र एका ग्रामपंचायतीला पिवळे कार्ड मिळाले आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीला रेड कार्ड मिळालेले नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मान्सूनपूर्व आणि मान्सूनपश्चात अशी दोन टप्प्यात स्वच्छता सर्वेक्षण मोहिम घेण्यात येते.
www.konkantoday.com