
मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात भरधाव कारची मालवाहतूक ट्रकला धडक ,भीषण अपघात, लातूर येथील वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू
भरधाव कारची मालवाहतूक ट्रकला पाठिमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यात लाखपाले गावाजवळ घडली.डॉ.पल्लवी पळशीकर (वय ३५ रा. लातूर) असे अपघातातील मृत वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचे नाव असून तर डॉ. विशाल रमेश बडे (वय ३०, रा. अनपटवाडी पारगाव जि.बीड ) हे गंभीर जखमी झाले.महाडहून मुंबईकडे (MH.४३.Y.६०५६) हा मालवाहतूक ट्रक महामार्गावर धावत असताना पाठीमागून येणाऱ्या (MH.१४.MC९८५९) या भरधाव कारची मालवाहतूक ट्रकला पाठीमागून जोराची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर होऊन डॉक्टर पल्लवी पळशीकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असणारे डॉ. विशाल बडे हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महाड येथील वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. व जखमी विशाल बडे यांना रुग्णालयात दाखल केले.




