दापोली शहरात झालेल्या दुचाकी अपघातात दोघे जखमी

दापोली शहरातील महालक्ष्मी रोडवरील कब्रस्तानजवळ २ दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी १ च्या दरम्यान घडली. या बाबतची फिर्याद किराणामाल दुकान व्यावसायिक सर्वेश काशिनाथ जाधव (३९, रा. टाळसुरे) यांनी दिली. फिर्यादीनुसार जाधव हे हिरो प्लेझर मोपेड दुचाकी घेवून महालक्ष्मी रोडकडून दापोलीकडे चिकन घेण्यासाठी जात होते. ते महालक्ष्मी रोडवरील कब्रस्तानजवळ आले असता समोरून येणार्‍या एका अज्ञात दुचाकीस्वाराच्या ताब्यातील दुचाकीचा (०८ एएस ५१७३) ताबा सुटल्याने त्याने जाधवच्या दुचाकीला धडक दिली. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात दापोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button