दापोली येथील समुद्र किनारे बंदच्या वृत्ताने हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान
समुद्रातील बोटींग, जलक्रीडा अर्थात वॉटर स्पोर्टसला शासनाकडून २६ मे पासून २१ ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मात्र एका वाहिनीवर समुद्र किनारे शासनाकडून बंद असे चुकीचे वृत्त दाखविण्यात येत असल्याने पर्यटकांनी हॉटेल बुकींग रद्द केल्याचे समजते. यामुळे पर्यटन व्यावसायिकांकडून संताप व्यक्त होत आहे.शासनाकडून २६ मे रोजी समुद्रात बोटींग करणारे अर्थात वॉटर स्पोर्टला ३१ ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मात्र पर्यटन व्यवसाय हा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असतो. परंतु चुकीच्या वृत्तामुळे हॉटेल रिसॉर्ट व्यावसायिकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.समुद्रकिनारे बंद झाल्याचे वृत्त समजताच पर्यटकांनी आपले बुकींग रद्द केले आहे. आधीच पर्यटक कमी त्यात चुकीच्या बातम्यांमुळे व्यावसायिकांची मोठी आर्थिक हानी झाल्याचे पर्यटन क्षेत्रातून सांगण्यात आले. यामुळे यापुढे तरी डोळे उघडा व नीट पहा अशी संतप्त प्रतिक्रिया हॉटेल व रिसॉर्ट मालकांकडून व्यक्त होत आहे.www.konkantoday.com