जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची मागणी

राज्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मनुस्मृतीच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमातील सहभागावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज मनुस्मृतीचा निषेध करत महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर जाऊन पाणी प्यायले.त्यानंतर, मनुस्मृती फाडत असताना त्यांच्याकडून मनुस्मृती पुस्तकावरील बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्रही फाडण्यात आले. त्यानंतर, विरोधकांनी आव्हाड यांच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या असून आव्हाड यांच्या अटकेचीही मागणी करण्यात आली आहे. शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आव्हाड यांच्या कृतीचा निषेध करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर, वंचित बहुजन आघाडीनेही त्यांच्या या घटनेवर भाष्य करत संतप्त प्रतिक्रिया दिली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button