चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटकांसाठी अटी लागू

चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटकांच्या जिप्सी रिव्हर्स घेता येणार नाहीत. जिप्सी रिव्हर्स घेण्यावर वन्य प्रशासनाने बंदी घालतली आहे.तसेच आता वन्य क्षेत्रात पर्यटकांना घेऊन गेलेल्या जिप्सींना यू-टर्न मारण्यासाठी देखील बंदी घालण्यात आली आहे. मागील पाच दिवसांच्या कालावधीमध्ये पर्यटकांच्या जिप्सींनी वाघांचा रस्ता अडवल्याच्या घटना दोनदा घडल्या आहेत. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोअर झोनमध्ये टी-114 वाघिणीला घेराव करून डझनभर जिप्सी उभ्या असल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वन्य प्रेमींनी यावर आक्षेत घेतला होता. त्यानंतर ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने मोठा निर्णय घेत 10 जिप्सी गाईड व चालकांना पर्यटन साखळीतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संबंधित घटकांची बैठक घेत प्रशासनाने हा नवा नो यू-टर्नचा नियम लागू केला आहे.www.konkantoday com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button