गुहागर बाजारपेठेत ११ केव्ही वाहिनीमुळे अपघात होण्याची शक्यता

गुहागर बाजारपेठ सोनारवाडी जुने मच्छीमार्केट येथे ११ केव्ही वाहिनीवरील व्हीक्रॉस हा चुकीच्या पद्धतीने तारेने बांधून घेतलेला आहे. पावसाळ्यामध्ये तिथे अपघात होण्याची शक्यता आहे. हीबाब लक्षात घेवून त्वरित दुरूस्ती करावी, अशा मागणीचे निवेदन गुहागर शहर शिवसेना उबाठातर्फे महावितरण उपविभाग कार्यालयाला देण्यात आले.गुहागर शहरामध्ये साधारण आठवडाभर व्होल्टेज हे कमी प्रमाणात येत आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिक आणि बाजारपेठेमधील व्यावसायिकांना होत आहे. याकडे तत्काळ लक्ष द्यावे व वीज पुरवठा सुरळीत व्हावा. वरील विषयासंदर्भात वेळोवेळी निदर्शनास आणून देखील कोणतीही दखल घेतली गेली नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button