खेड तालुक्यातील तळघर येथील चिरा खाणीवर लाखो रुपयांची वीज चोरी करणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल

अनधिकृतपणे गेल्या पंधरा महिन्यांपासून वीज चोरी करून ७६ हजार ९३ युनिटसˆचा वापर करीत महावितरणची १३ लाख ३४ हजार ३९० रूपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी खेड तालुक्यातील तळघर येथील रामचंद्र भागोशी बुदार व राकेश रामचंद्र बुदार यांच्यावर भारतीय विद्युत अधिनियम सुधारणा २००३ अधिनियमचे कलम १३५ नुसार चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात महावितरण भरारी पथक पेण येथील उपकार्यकारी अभियंता विजय राजेश धरमसारे यांनी तक्रार दिली असुन तक्रारीत म्हटल्याप्रमाणे दि. २४ एप्रिल २०२४ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या कारवाईला सुरूवात झाली आहे. एमआयडीसी उपविभागीय रत्नागिरी जिल्हा यांच्या अखत्यारित येणार्‍या खेड तालुक्यातील तळघर या परिसरातील वीज चोरी शोधून काढण्यासाठी स्वतः विजय धमरसारे, तसेच सहाय्यक अभियंता आशिष मेश्राम, सहाय्यक व अधिकारी शशिकुमार तांबे, वरिष्ठ तंत्रज्ञ राकेश पाटील यांच्या पथकाने वीज ग्राहक रामचंद्र भागोजी बुदार व वापरदार राकेश रामचंद्र बुदार यांचा ग्राहक क्रमांक २२२३६०००२०५८ या चिरेखाणीच्या वीज पुरवठा असलेल्या वीज संचाची तपासणी केली. यामध्ये या मीटरमधून वापरत असलेल्या वीज पुरवठ्यासंबंधी सदर वीज मीटर हाताळलेला पहायला मिळाला. या मीटरच्या टर्मिनलचे स्क्रू सैल करून ग्राहक हा मीटर डिस्प्ले व पल्स बंद करीत असल्याचे आढळून आले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button