
कोरेगाव संगलट बौद्धवाडी वासीयांचा प्रवास यंदाही खड्ड्यांतूनच ! रस्ता सर्वत्र उरखडल्याने वाहनचालकांची कसरत खेड( मुराद अफवारे )
खेड तालुक्यातील अति महत्वाचा आणि मंडणगड दापोली गुहागर यांना जोडला जाणारा रस्ता म्हणून ओळखला जातो तो कोरेगाव संगलट बुद्धवाडी रस्त्याची अक्षरश चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दापोली मंडणगड गुहागर तालुकावासीयांचा प्रवास यंदाही खड्क्यातूनच करावा लागणार आहे. मे महिना संपलाअसला तरी रस्ता दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. केवळ लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे निमित्त ठरल्याने याचा त्रास गावातील प्रवाशांना सहन करावा लागणार असून, या बेफिकीर कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.दळणवळणाच्या दृष्टीने आणि तीन तालुक्याला जोडणाऱ्या मार्गाची अनेक वर्षे देखभाल दुरुस्ती झालेली नाही. या ५ कि.मी. च्या टप्प्यात प्रचंड खड्डे पडले असून,खडी अस्ताव्यस्त पसरली आहे. तसेच एक ते दीड फूट पडलेले खड्डे यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होत आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे. दुरुस्तीबाबत गावांतील जागृत ग्रामस्थानी सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकारानी वेळोवेळी आवाज उठवला असतानाही त्यांच्या मागणीला बांधकाम विभागाने ‘वाटण्याच्या अक्षता’ लावल्या. या मार्गावर खेड दापोली आगाराच्या एस. टी. बस धावतात. या गाड्यांना प्रवासी भारमानही चांगले आहे. मात्र खड्यातून धक्के खात प्रवाशांना आपला प्रवास करावा लागत आहे.*वळणांना झाडाझुडपांचा अडथळा*या रस्त्यावर वळणांचे प्रमाण मोठे असून झाडाझुडपांचा वेढा पडला असल्यामुळे समोरून येणारे वाहनही दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या अरुंद रस्त्यात साईडपट्टीही गायब झाल्यामुळे एकावेळी दोन मोठ्या वाहनांना बाजू घेताना तारेवरची कसरत करावी लागते. कोरेगाव च्या पुढे चढाव पार केल्यानंतर असणाऱ्या दरीच्या ठिकाणी संरक्षक कठडे उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. दापोली तालुक्यातील चाकरमान्यांसाठी जवळचा मार्ग असून गावातील चाकरमान्यांना हा सर्वात जवळचा मार्ग मानला जातो. पंचक्रोशीतील ग्रामस्थांना बाजारहाट, रुग्णांना आरोग्य सुविधेसाठी दवाखाने, शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी नेहमी हाच रस्ता सोयीस्कर ठरतो. मात्र दळणवळणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या मार्गाकडे बांधकाम विभागाच्या या अक्षम्य दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांमधून संतापाची लाट उसळली आहे.मात्र, अशा स्थितीत या मार्गावर वाहनाने पळवता येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. *लोकप्रतिनिधीचे अक्षरशः दुर्लक्ष* स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी यांनी कोरेगाव संगलट रस्त्याकडे अक्षरशा दुर्लक्ष केले आहे त्यामुळे ह्यांचा फटका हजारो मतदाराला बसणार आहे नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये अनेक लोकप्रतिनिधीने अनेक विकासाची गाजरे दाखवली मात्र त्याच्या भूलथाप्याचा काही गाजर ने काम केलेल्या नाही त्याचा फटका या कोरेगाव संगलट रस्त्याला बसला आहे डोक्यावर असलेल्या पावसामुळे या रस्त्याच्या खड्ड्याच्या साम्राज पसरल्याने अनेकाला आपला नहाकबळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सदरचा रस्ता व्हावा म्हणून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व पत्रकाराने लोकप्रतिनिधीची भेटीगाठी घेऊन रस्त्याबाबत समस्या मांडली मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद नाही आता जनता येणाऱ्या विधानसभा च्या निवडणुकीची वाट पाहत असून येत्या निवडणुकीमध्ये हिशोब चुकता करण्याचा विचार ही मतदार जनता करीत आहे *या भागाचा विकास रामदास भाई मुळे झाला* खारीपट्ट्यातील विकासाची गंगा आणली ती रामदास भाई कदम यांनी आणली त्यांच्यामुळे गल्ल्या गल्ल्यांमध्ये डांबरी रस्ते गटारे झाले त्यांच्या मतदार संघ बदलल्यानंतर या भागाचा कोणताच विकास झालेला दिसून येत नसल्याची चर्चा आता उघड होऊ लागले आता भूल थापाला मतदार बळी पडणार नाही आता विकासाचा हिशोब चुकता होणार असे जनतेतून प्रतिक्रिया उमटत आहे *चोरट्या वाळूच्या गाड्या संगलट कोरेगाव मार्गावरून* बहिरोली खाडीतून चोरटी वाळू उत्खन होऊन सदरचे ही वाळू कर्जी हिथून वाळू ने भरलेल्या गाड्या बहिरोली मार्गांनी न जाता कोरेगाव संगलट चोरट्या मार्गाने धावत आहे या बाबीकडे महसूल खात्याचा कोणताच लक्ष नाही त्यामुळे ह्या रस्त्याचे वाटोळे या गाड्यांनी देखील लावलेले आहे यांच्यावरही देखील कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकातून होत आहेत