
संपर्क युनिक फाउंडेशन चे अध्यक्ष शकील गवाणकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड
रत्नागिरी… संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली असून ही निवड ५ वर्षांसाठी आहे.
शकील गवाणकर हे गेली २५ वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत, साहित्य,पत्रकारिता क्षेत्रात ही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.बारामती मधील भावनगरी या साप्ताहिकाचे ते रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून माय कोकण चे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत, संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या संस्थेत गेली ५ वर्षे ते सामाजिक कार्य करीत आहेत,तसेच विविध संस्था मध्ये ते कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांचा प्रचंड असा लोकसंग्रह आहे, शैक्षणिक क्षेत्रात गेली १० वर्षे ते काम करत आहेत, अशा चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा.उदयजी सामंत साहेबांच्या शिफारशीनुसार त्यांची निवड करण्यात आली.सामाजिक कार्य करीत असताना उद्योजक किरण सामंत, रमजान गोलंदाज, सुहेल मुकादम यांचे सतत मार्गदर्शन मिळत आहे असे शकील गवाणकर यांनी सांगून आपल्याला जी जबाबदारी सोपविण्यात आली आहे त्याचा लाभ सर्वसामान्य लोकांना नक्कीच करून देईन अशी प्रतिक्रिया शकील गवाणकर यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com