सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या जलपर्यटनाला अखेर ब्रेक
पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारचे जलपर्यटन २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्याच्या आदेशाची कार्यवाही रविवारपासून बंदर आणि पर्यटन विभाग सुरू करणार आहे. त्यामुळे सलग तिसर्या वर्षी २६ मे पासून सागरी जलपर्यटन आणि सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंतीसाठी मालवण गाठणार्या पर्यटकांवर बंदर जेटीवरूनच किल्ले सिंधुदुर्गला अभिवादन करण्याची वेळ येणार आहे. दरम्यान, पर्यटकांची संभाव्य नाराजी टाळण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने बंदर विभागाकडे सहा दिवसांची मुदतवाढ मागवली होती. त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने जलपर्यटनाला शनिवारी सायंकाळनंतर ब्रेक लागला होता.www.konkantoday.com