सिंधुदुर्गात कॅनिंग व्यापार्‍यांकडून आंबा शेतकर्‍यांची लूट, कमी दराने खरेदी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे हापूस आंबा कॅनिंगचा दर ४४ ते ४५ रुपये असताना वेंगुर्ले तालुक्यातील काही मोठे कॅनिंग व व्यापारी ३३ रुपये दराने आंबा खरेदी करून शेतकर्‍यांची लूट करीत आहेत. यामुळे शेतकर्‍यांना एका टनामागे सुमारे ११ हजारांच्या आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे कॅनिंग व्यापार्‍यांनी ही शेतकर्‍यांची फसवणूक थांबववावी, अन्यथा वेगळ्याा पद्धतीने उत्तर देण्यात येईल, असा इशारा माजी उपसभापती तथा मातोंड येथील आंबा बागायतदार प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब यांनी दिला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button