लांजा तालुक्यातील वेरळ येथे क्रशरच्या उत्खनन कामामुळे घराला तडे
मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी वेरळ गावानजीक वेरळ आणि कुर्णे या गावच्या सीमेवर असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काळ्या दगडाचे उत्खनन सुरू आहे.. मात्र शासकीय परवानगी पेक्षा जास्त प्रमाणात खोल म्हणजे ३० ते ४० फुट खोल काळया दगडाचे ब्लास्टिंग करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.आणि त्यामुळेच वेरळ गावातील अनेक घरांच्या भितींना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून घरेही धोकादायक बनली आहेत. अगदी कच्च्या पक्क्या घरांबरोबरच स्लॅबच्या घरांच्या भिंतीना देखील तडे गेल्याने ग्रामस्थांतून तीव्र संतापाची लाट उसळली आहे.त्याचप्रमाणे २४ तास चालणाऱ्या क्रशरचा मोठा त्रास गावातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. गावातील काही घरांमध्ये आजारी रुग्ण आहेत मात्र रात्रीच्या वेळी देखील हा क्रेशर सुरू असल्याने त्याचा त्रास आजारी रुग्णांना सहन करावा लागत आहे .याखेरीज ब्लास्टिंग आणि क्रशरमुळे अनेकग्रामस्थांच्या घरात धुळीचे साम्राज्य पसरले असून आंबा, काजू सारख्या फळझाडांवर मोठ्या प्रमाणात धुळ साचून नुकसान होत आहे