
राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात २४ तास आपत्कालीन मदत पथके नेमा
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर आगामी पावसाळ्यामुळे येणार्या विविध समस्या, चौपदरीकरणादरम्यान निर्माण झालेल्या समस्या, प्रलंबित कामे, अतिपर्जन्यवृष्टीमुळे निर्माण होणार्या आपत्कालीन समस्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आढावा घेण्यात आला. पावसाळ्यातील अपघात टाळण्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी २४ तास सर्व साधनसामुग्रीसह आपत्कालीन मदत पथक नेमण्याच्या सूचना महामार्ग सुरक्षा पथकाने पोलीस उपअधिक्षक घनश्याम पलंगे यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिल्या.www.konkantoday.com