मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आपत्ती निवारण विभागाची विशेष बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आपत्ती निवारण विभागाची विशेष बैठक आज पार पडत आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेदेखील उपस्थित आहेत. यासोबतच मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव नितीन करीर, मदत आणि पुनर्वसन सचिव सोनिया सेठी, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, तसेच आर्मी, नेव्ही,एअर फोर्स, कोस्ट गार्ड, मध्य आणि पश्चिम रेल्वे, मुंबई मेट्रो, म्हाडा, एनडीआरएफ, एसडीआरएफचे अधिकारी आणि संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत.www.konkantoday.com