
पावसाने झोडपले, संगमेश्वर परिसरातही पूरपरिस्थिती
सोमेश्वर परिसरात शास्त्री नदीचे पाणी शिरले आहे संगमेश्वर बाजार पेठ , आठवडा बाजार, रामपेठ रोड, गणपती मंदिराजवळ, गद्रे वखार, भिडे वखार आदी भागात शास्त्री नदीचे पाणी शिरले आहे.
पावसाचा जोर कायम असून यावर्षीचा पहिलाच पुर आला आहे सुरक्षिततेचा उपाय म्हणून नदीकाठच्या घरांतुन नागरिकांनी स्थलांतर केले असून व्यापारीही आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत.
www..konkantoday.com