पर्यटन हंगाम अद्याप शिल्लक परंतु समुद्रातील जलक्रिडेला ब्रेक, पर्यटकांच्या आनंदाचा हिरमोड
पर्यटन हंगाम अद्याप संपुष्टात आलेला नाही. मात्र समुद्राच्या पाण्यात आनंद लुटणार्या पर्यटकांचा मात्र जलक्रीडा बंद झाल्याने हिरमोड झाल्याचे चित्र समोर आले आहे.दापोली तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मुरूड, पाळंदे, कर्दे, लाडघर येथे वॉटर स्पोर्टस सुरु आहे. या पर्यटनक्षेत्रांवर जलक्रीडा अर्थात बोटींग, वॉटर स्पोर्टचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक इच्छूक असतात. तालुक्यात जवळपास २० जण बोटींगचा व्यवसाय करतात. प्रत्येक बोटींगसाठी ५ जण असे जवळपास एकूण १०० लोकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. परंतु २६ मे पासून हा बोटींग अर्थात जलक्रीडा व्यवसाय बंद करण्यात आला आहे. २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत हा व्यवसाय बंद ठेवायचा असतो. परंतु दसरा व दिवाळी सुरू झाल्याशिवाय पर्यटनाला येत नाहीत. त्यामुळे हॉटेल व्यवसायासह वॉटरस्पोर्टस बंद ठेवण्यात येतात. परंतु एकदा पर्यटन सुरू झाल्यानंतरच हॉटेल, रिसॉर्ट व बोटींचा व्यवसाय सुरु करण्यात येतो. www.konkantoday.com