पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षण ठरणारे रत्नदुर्गवर शिवसृष्टीची उभारणी वेगात सुरू
रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्याचे काम गतीने सुरू असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा २४ फूट उंच पुतळा उभारला जाणार आहे. यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. या कामाची नुकतीच राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहणी करत आढावा घेतला.शहरातील रत्नदुर्ग किल्ल्यावर पर्यटनाच्यादृष्टीने विचार करून शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी विविध किल्ल्यांच्या प्रतिकृतीसह छत्रपतींचा इतिहास नजरेखालून घालता येणार आहे. या शिवसृष्टीमध्ये २४ फूट उंच छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ही शिवसृष्टी रत्नागिरीकरांसाठी गौरवाचे एक स्थान बनेल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. www.konkantoday.com