पत्नीशी झालेल्या भांडणाचा राग येवून पत्नीला सरकारी कार्यालयात मारहाण केली, पतीविरूद्ध गुन्हा दाखल
चिपळूण-भोगाळे येथील राहणार्या सौ. नमीरा मालगुंडकर यांचे आरोपी अस्लम मालगुंडकर हे पती असून यातील आरोपी अस्लम यांचे बाहेरील स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याने फिर्यादी व आरोपी यांचे भांडण तंटे होत असत. यातील फिर्यादी या आरोपीचे प्रेमसंबंध असलेल्या महिलेला भेटण्यासाठी इंदापूर येथे गेल्या होत्या. त्यावरून पती अस्लम याला राग आला. यातील फिर्यादी या त्यांच्या सरकारी कार्यालयात काम करीत असताना आरोपी पती ऑफिसमध्ये आला व त्याने फिर्यादी पत्नी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. व त्यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. या झटापटीत फिर्यादी यांचे कपडे फाटले. याबाबत त्यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यावर आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com