देशातील करोडो गरीब महिलांच्या बँक खात्यात दरमहा 8500 रुपये टाकले जातील- राहुल गांधी
4 जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार येईल आणि त्यानंतर देशातील गरीबांची यादी तयार केली जाईल. प्रत्येक गरीब कुटुंबातून एका महिलेचे नाव निवडले जाईल अन् अशा देशातील करोडो गरीब महिलांच्या बँक खात्यात दरमहा 8500 रुपये टाकले जातील. याची सुरुवात येत्या 5 जुलैपासून केली जाईल.”या सभेपूर्वी त्यांनी भोजपूर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “आता नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होणार नाहीत, हे निश्चित आहे. ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. भाजप जिंकला तर संविधान बदलून टाकेल. मी जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले- भारतात फक्त दोनच जाती आहेत. श्रीमंत आणि गरीब. देशात फक्त 2 जाती आहेत तर नरेंद्र मोदी ओबीसी कसे झाले? म्हणून आम्ही ठरवलंय…इंडिया आघाडी सत्तेवर येताच आम्ही देशात जात जनगणना करू. नरेंद्र मोदींची अग्निवीर योजना देशाच्या लष्कर आणि तरुणांच्या देशभक्तीचा अपमान आहे. आमचे सरकार स्थापन होताच आम्ही सर्वप्रथम अग्निवीर योजना रद्द करू.”