
दापोली तालुक्यातील हर्णैत विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम
दापोली तालुक्यातील मासळी व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या हर्णै येथे जवळपास ८ ते १० दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात आल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मात्र विजेच्या वारंवार होणार्या लपंडावामुळे व कमी दाबामुळे होणार्या वीजपुरवठ्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे हर्णै ग्रामपंचायतीकडून समोर आले.तालुक्यातील हर्णै, पाजपंढरी, शिवाजीनगर, अडखळ अशा गावांना बांधतिवरे येथून नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही दिवसांपूर्वी पाईपलाईन नादुरूस्त झाल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याचेही समोर आले परंतु आता पाईपलाईन दुरूस्तही झाल्याचे समोर आले आहे. परंतु हर्णैवासियांना ८ दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. www.konkantoday.com