
सीएनजी भरण्यासाठी उभ्या असलेल्या कारला बोलेरो पिकअपची धडक
भरधाव वेगात असलेल्या बोलेरो पिकअप गाडीने मुंबई-गोवा महामार्गावरच्या वालोपे येथील ममता गॅस एजन्सी येथे सीएनजी गॅस भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या तीन कारला धडक दिली. त्यानंतर मुंबईच्या दिशेने पळून जाताना पुन्हा एका कारला धडक देवून अपघात केल्याची विचित्र घटना शनिवारी रात्री घडली. पळून गेलेला बोलेरो अपघात स्थळापासून १ कि.मी. अंतरावर पलटी झाला असून अपघातात एक कारचालक गंभीररित्या जखमी झाला. मद्यपी बोलेरो चालकावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश संदीप आचरेकर (२४, देवगड) असे गुन्हा दाखल झालेल्या बोलेरो चालकाचे नाव आहे.www.konkantoday.com