
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ट्रक-दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू
पेडणे तालुक्यातील न्हयबाग जंक्शन येथे ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होवून शुक्रवारी झालेल्या अपघातात दुचाकीवरील सुनीता राजाराम नाईक (५०, रा.तोरसे) या महिलेचा मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार कुडाळ येथी ट्रक चालक पंडित नाईक (४७) हा ट्रक (जीए ०१ यु २५४३) न्हयबागच्या अंतर्गत रस्त्यावरून पत्रादेवीच्या दिशेने जात होते. यावेळी मालपेहून पत्रादेवीच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीची ट्रकला जोरदार धडक बसली. www.konkantoday.com