
सतत दोन वर्ष दुरूस्तीचे काम करूनही चिंचाळी धरणाचा धोका कायम
मंडणगड तालुक्यातील सर्वात जुन्या चिंचाळी धरणाची गत दोन वर्षापासून दुरूस्ती सुरू आहे. त्याकरिता करोडो रुपयांचा निधी शासन खर्च करत आहे. मात्र विविध समस्यांमुळे धरणाचे धोके कमी झालेले नाहीत. दुरूस्ती कामादरम्यान धरणव्याप्त परिसरातील शेकडो एकरातील झाडांची तोड करण्यात आली आहे. यामुळे जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाल्याने ते पाणी थेट धरणात येणार असल्याने यंदा धरणातील पाणी साठ्यात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे यंत्रणेने केलेली दुरूस्तीची मलमपट्टी किती तग धरेल याचे उत्तर यंदाच्या पावसात मिळणार आहे. www.konkantoday.com