शिवसेना सचिव माजी. खासदार विनायकजी राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयात ममता दिन साजरा.

तमाम शिवसैनिकांना मायेची सावली देणाऱ्या माय माऊली, माँसाहेब मीनाताई ठाकरे ह्यांच्या जयंती म्हणजेच ‘ममता दिनी’ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली.शिवसेना सचिव माजी. खासदार विनायकजी राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयात ममता दिन साजरा करण्यात आला. माँसाहेबांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी उपजिल्हा प्रमुख शेखर घोसाळे, तालुका प्रमुख बंड्याशेठ साळवी, उपतालुका प्रमुख विजय देसाई, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, उपशहर प्रमुख नितिन तळेकर, विभाग प्रमुख मयूरेश्वर पाटील, सलिल डाफळे, अमित खडसोडे, शकील महालदार, धनंजय नलावडे, प्रशांत सुर्वे, उपविभाग प्रमुख प्रविण सुर्वे, दिलावर गोदड तसेच बिपिन शिवलकर, मौला नदाफ, रवी जगताप आणि माजी नगरसेविका रशीदा गोदड उपशहरप्रमुख विजया मामी घुडे, उन्नती कोळेकर, सेजल बोराटे, माजी नगरसेविका राजश्री शिवलकर, पूजा जाधव, सुवर्णा कडू, स्मिता काटकर शिरधनकर हिना दळवी, रमीजा तांडेल, रिहाना आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button